नळदुर्ग : सचिन गायकवाड
होर्टी ता. तुळजापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या भूमिपुत्रांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्या अतुलनीय अशा कार्यातून एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या गावातील गुणवंत व्यक्तींच्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी थोर समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सत्यवान सुरवसे, श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सिद्रामप्पा खराडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता राजमाने, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाच्या संचालिका पवित्राताई सुरवसे, सरपंच ज्ञानेश्वर भोसले, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार भैरवनाथ कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले संजय गुंजोटे, मधुकर गायकवाड , आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमात येथील प्राचार्य गोरख घोडके प्रा.डॉ .सोमशंकर राजमाने, मंत्रालय सहाय्यक सचिव नितीन राजमाने, महादेव खराडे, दयानंद सिध्दमल्ले, योगेश खराडे , सोमशंकर खराडे, हरिदास महाबोले, नारायण वाघमारे, राहुल राजमाने, गणेश वर्दे, सोमनाथ राजमाने, प्रदीप तरमोडे, अरुण अंगुले, सत्यनारायण राजमाने, विजय सगर, ज्ञानेश्वर भोसले, बाबासाहेब अंकुशे, सागर राजमाने, जीवन घोडके, प्रमोद तरमोडे श्रीकांत कोळी गुरुलिंग सिध्दमल्ले आदींसह विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा डॉ. सिद्रामप्पा खजुरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी जिद्द ,आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही काम निष्ठेने केल्यास आणि आपल्या क्षमतेवर आपला दृढ विश्वास ठेवल्यास यश हे निश्चित असल्याचे मत व्यक्त केले. याशिवाय प्रकाश चव्हाण, सत्यवान सुरवसे, सिद्रामप्पा खराडे, भैरवनाथ कानडे यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता राजमाने यांनी तर सूत्रसंचालन मन्सूर शेख यांनी केले. सोमनाथ सरोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास होर्टी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
