नळदुर्ग : सचिन गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायतीला सन २०१७-१८ चा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. 

जिल्हा परिषदेच्या सभाग्रहात दि.१५ सप्टेंबर २०१८  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते ,जिल्हा  परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील याच्यां हस्ते  सन्मान पञ देऊन आलियाबादच्या सरपंच ज्योती चव्हाण , ग्रामसेवक प्रशांत भोसले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला बालकल्यान सभापती सकुताई पवार , प.स. सभापती शिवाजी गायकवाड, ज्योती पञिके, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, उद्धव साळवी,  कु. सक्षणा सलगर, अस्मिता कांबळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख, रमाकांत गायकवाड, विस्तारा अधिकारी संजय राऊत, के.बी.भांगे यांच्यासह जिल्हायातील सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top