तुळजापूर : कुमार नाईकवाडी
सोमवार रोजी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.मणेर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्ष व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधुन या प्रसंगी ग्रंथालय विभागातर्फे व प्रा.दिपक निकाळजे यांच्या पुढाकाराने दुर्मिळ व ऐतिहासिक ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रा.जयसिंगराव देशमुख, काटी तथा रसायनशास्त्र माजी विभागप्रमुख विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी स्वामी रामानंद तिर्थ यांची प्रतिमा भेट म्हणुन दिली.
या प्रसंगी मुख्याध्यापक वागदकर,प्राचार्य दोंड,प्रा.सतिश वडगांवकर,प्रा.डॉ .मेजर वाय.ए.डोके,प्रा.धनंजय लोंढे यांची प्रमुख ऊपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.आशपाक आतार यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
