अंबाजोगाई : दत्ता खोगरे

मुलांच्या कला गुणांची प्रगती पाहून  मला आनंद वाटला असे प्रतिपादन आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी केले.

स्व.मदन बप्पा यादव विचार मंच व देवळा श्रमकारी ग्रुप यांच्या वतीने सभापती देशमुख सत्कार करण्यात आला व  शालेय समिती देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा ता. अंबाजोगाई येथे शाळेतील मुलांना  गणवेश वाटप व सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक सरवदे कचरू होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब  देशमुख, वैजनाथ सोनवणे, आण्णासाहेब डांगे, डाँ राऊत साहेब, भानुदास  देवरवाडे ,रावसाहेब यादव, नानासाहेब शेळके, कल्याण देशमुख,  दशरथ सोनवणे, सरपंच यादव वत्सलाबाई ,मनिषा  पवार, दशरथ पवार,उमेश पवार, ग्रामसेवक धुमाळ नितीन आदी उपस्थित होते.

यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी जि.प.शाळाह्या गरीबांची म्हणुन ओळखली जाते  ग्रामीण भागातील पालकांनी जि.प.शाळा आपली वाटावी  यासाठी शाळेच्या दुरुस्तीसाठी दोन लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले  
यावेळी साविञीबाई फुले,संत गाडगेबाबा, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हास्ते करून कार्यक्रमाला  सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील शाळेत शिक्षण घेवून एम बी बी एस ला नंबर लागलेल्या आत्मम वामन आदमाने, तसेच जिल्हास्तरीय कलाश्री पुरस्कार प्राप्त अमोल सगट यांचा प्रमुख पाहूण्याच्या हास्ते सत्कार करण्यात आला यावेळी देवळा श्रमकारी ग्रुपच्या सामाजिक कार्याची धडपड पाहून शालीय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  
या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रभाकर सगट यांनी केले तर सुञसंचालन रविंद्र देवरवाडे यांनी केले तर आभार गंगणे यांनी मानले यावेळी गावातील पालक  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top