तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 येथील नव्याने निर्माण झालेल्या कुलस्वामिनी हौसिग सोसायटी पुजारी नगर येथील गणपती मंडळाची श्री ची आरती तुळजापूर रत्न प्रसिद्ध सिने अभिनेता उमेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.

झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली " तुला पाहते रे " या मालिकेत विक्रांत सरंजामे यांच्या बॉडीगार्ड विथ सहकारी झेंडे यांच्या भूमिकेत उमेश जगताप काम करीत आहे. यापूर्वी हि उमेश जगताप यांनी यापूर्वी कारे दुरावा,तुझं माझं ब्रेकअप,ग्रहण,क्राईम पेट्रोल,अंजली,तर चित्रपट श्वास ,किल्ला ,दिसको सन्या,दम और दम, सतार डे संडे,वजनदार,अशा अनेक मालिका व चित्रपटात उत्कृष्ठ काम केले आहे.

कुलस्वामिनी सोसायटी येथील श्री ची आरती झाल्यानंतर  सोसायटी अध्यक्ष अनिल धोत्रे, अनिल काशिद, हरिदास  नाईकवाडी, अनिल आगलावे, ओंकार पंडित, ग्रामसेवक चौगुले, विनेश कांबळे, विलास होळकर, राजू पारवे, आकाश काशिद आदींनी उमेश जगताप यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
 
Top