उस्मानाबाद :

सराफ-सुवर्णकार असोसिएशनच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संजय गणेश (साळी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़. कार्याध्यक्षपदी विजयकुमार विखे (कळंब) तर सचिवपदी मयूर जालनेकर (उस्मानाबाद) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे़.  नूतन पदाधिका-यांचा भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़.

उस्मानाबाद येथे न्यू कालिका ज्वेलर्सच्या दालनात जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या नूतन पदाधिका-यांचा रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विष्णूदास सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती़.

नूतन शहराध्यक्ष रामदास वंजारी, सचिव लक्ष्मण ओमासे, ज्येष्ठ सुवर्णकार सतीश घुले, दत्ता माळी, सुदाम खाडे, व्यंकटेश ओमासे, सिद्राम नागरगोजे, कुणाल निंबाळकर, ऋषिकेश ओमासे, बब्बर सानप, शशिकांत सानप, प्रकाश खंडेलवाल, राजेश कदम, सौदागर माळी, टेहरे बंधू, संजय पंडीत, गणेश नायगावकर, दिलीप महामुनी, प्रितम सानप, पांडुरंग तळणकर, जितेश घेलोर, पृथ्वीराज महामुनी, राजेश कदम, संतोष सुरवसे, बाळासाहेब म्हेत्रे, थडवे बंधू, युवराज हुच्चे, संतोष शहा, विद्यानंद साखरे, गणेश पोतदार, प्रविण झोरे, अंकुश कदम, दिलीप इंगळे, विजय मुंडे, नितीन मुंडे, पद्माकर पोतदार आदी उपस्थित होते.

शहर कार्यकारिणीची निवड घोषीत 

शहराध्यक्ष रामदास वंजारी, सचिव लक्ष्मण ओमासे, कार्याध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, उपाध्यक्ष भागवत पोतदार, सहसचिव विनय सारडा, कोषाध्यक्ष नारायण टेहरे, सहकोषाध्यक्ष गणेश नायगावकर, संघटक विलास थडवे, सहसंघटक सौदागर माळी, संयोजक दिलीप महामुनी
 
Top