![]() |
| पं.स. सभापती शिवाजी गायकवाड |
उस्मानाबाद :
ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देवून उदयोग निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांच्यावतीने स्वयंरोजगार करु इच्छिणा-या युवक-युवतींसाठी रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक, युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.
भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद व तुळजापूर पंचायत समितीच्यावतीने रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील कुक्कट पालन कॅम्प, रामनगर येथे सदरील प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणात पेपर बॅग, दुचाकी वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रीक मोटार दुरुस्ती, अगरबत्ती उत्पादन, रेशीम कोष उत्पादक, पापड उदयोग आदी व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
