उस्मानाबाद : 

पावसाभावी पिके करपून जात असून सध्याच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना भरीव स्वरुपाची मदत दयावी, तसेच शेतक-यांना विमा संरक्षणाची रक्कम देण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2018-19 च्या खरीपाची पेरणी उस्मानाबाद जिल्हयातील शेतक-यांनी अल्पशा पावसावर केली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे व वेळवर पाऊस पडत नसल्याने बहुतांश शेतक-यांची पिके ही करपून जात आहेत. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याकरीता शासनाने उस्मानाबाद जिल्हयातील प्रत्येक गावातील शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी करुन तातडीने पंचनामे करावेत व शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी भरीप स्वरुपाची करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच सन 2017-18 या वर्षी शेतक-यांनी बँकामध्ये सोयाबीन, उडीद, मुग व इतर पिकांवर विमा भरुनही त्या शेतक-यांना विमा कंपनीकडून लाभ मिळाल्याचे नमूद करुन अशा लाभ न मिळालेल्या शेतक-यांना ताबडतोबड भरपाई देण्याचे आदेश बँकेला दयावेत व ज्या शेतक-यांनी विमा भरलेला नाही अशा शेतक-यांना शासन आदेशानुसार त्वरीत कार्यवाही होवून त्यांना खरीप पिकाच्या पिम्याचा मोबदल्याचा लाभ मिळावा, तसेच येत्या दहा दिवसात पंचनामे करण्यात आले नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष संचलित शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष शिवाजी घावटे, प्रहार जनशक्तीचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष मनोज जाधव, उपतलालुकाध्यक्ष विकास गोरे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष  मयुर काकडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top