काटी :- "माझ्या स्वप्नातील भारत, स्वच्छ भारत -हरित भारत" या कार्यक्रमांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द ता. तुळजापूर येथील पहिली वर्गात शिकणाऱ्या अंश नेताजी कदम या मुलाचे भारताच्या पंतप्रधानांनी कौतुक करून शुभेच्छा पत्र पाठवले आहे .या विद्यार्थ्यांनी वरील विषयास अनुसरून सर्वांना संदेश देऊन प्रत्येक नागरिकांची यातील भूमिका व त्याचे सहकार्य कसे असावे हे स्पष्ट करणारे चित्र काढून पंतप्रधानांना पाठवले होते. "हरित भारत व स्वच्छ भारत" ही चळवळ बनून समाजातील छोट्या मुलांमध्येही याविषयीची बिजे रुजून त्यांचे सहकार्य असावे व प्रत्येकाचा या मोहिमेत सहभाग राहिल्यास देशव्यापी लोक चळवळ बनत असते व यशस्वी ही होते . शाळेतील पहिली वर्गाचा चिमुकला याने सर्वसमावेशक असे चित्र साकारले .त्यातील बाल मनाची कल्पना पाहून आपणास आनंद झाला आहे .तसेच हाच उत्साह, विश्वास तुझा जीवनात सदैव राहून तुझे आयुष्य उज्ज्वल ठरो अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.



 स्वच्छ भारत मोहीम हा भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे .या निमित्ताने देशातील रस्ते, शहरे, गावे यांची स्वच्छता व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे या अभियानाचा उद्देश होता .यात शालेय मुलांमध्ये जागृती करणे व त्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले होते. यामध्ये मुलांनी सहभागी होण्यासाठी विविध उपक्रम होते .याने स्वच्छतेचे महत्त्व व फायदे यांची जाणीव करून देणे व या कार्यक्रमात त्यांच्या विविध कल्पना जाणून घेणे असा दुहेरी दृष्टिकोन या मागे होता. जेव्हा देशातील बालके ,विद्यार्थी अशा मोहिमेत जोडली जातात , तेव्हा खऱ्या अर्थाने तो देशव्यापी कार्यक्रम ठरत असतो.


शाळेमध्ये जुलै महिन्यात मुलांना याबाबत सर्व माहिती देण्यात आली. तसेच या संदर्भात चित्र स्पर्धाही झाली यात अंश या मुलाने काढलेले हे चित्र वैशिष्टय़पूर्ण ठरले. ते पंतप्रधानांना पाठवले होते. या चित्रातून पाणी व्यवस्थापन, शौचालय, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन ,परिसर स्वच्छता, प्लास्टिक बंदी, सांडपाण्याचे नियोजन या सर्व बाबी एकाच चित्रातून स्पष्ट केल्या .तसेच यामध्ये ग्रीन हाऊस ,पाणी वाचवा, झाडे लावा - झाडे जगवा, प्लास्टिक बंदी ,पाणी अडवा - पाणी जिरवा, अशा शब्दरूपी संदेशातून इतरांनाही आवाहन केले होते .शालेय मुलांचा स्वच्छतेत सहभाग दाखवून "एक कदम स्वच्छता की ओर " हे दाखवून स्वच्छता व जन आरोग्य यांचा सहसंबंध प्रतिबिंबित केला होता. तसेच तापमानवाढ ही जागतिक समस्या बनल्या असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे ,झाडे जगवणे हाच यासाठी सर्वोत्तम पर्याय असून त्याचे जतन करणे गरजेचे आहे. तेव्हाच हरित भारत बनून सर्वांना निसर्गासोबत जगण्याचा आनंद घेता ही बाबही यांमध्ये अधोरेखित केली होती .

अंशच्या वाढदिवसा दिवशीच त्याला कौतुकाची थाप व शुभेच्छा मिळाल्याने त्याचा वाढदिवस संस्मरणीय झाला .याने त्याचा आनंद द्विगुणीत झाला .त्याच्या बाल प्रतिभेबद्दल आईवडील सुमित्रा कदम, नेताजी कदम यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यास शुभेच्छाही दिल्या . शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवते व प्रत्येक कार्यक्रमातून मुलांची जडणघडण व्हावी , प्रत्येक बाबतीत तो परिपूर्ण असावा व घडावा यासाठी शाळेतील शिक्षक झटत असतात.

शाळेतर्फे ही अंशचा गौरव करण्यात आला. चा वेळी देविदास गायकवाड, शिवाजी वेदपाठक, विठ्ठल नरवडे, पांडुरंग जावळे , मनोज पाटील, प्रशांत वैदकर, बाळू मुंडे, अंजली निकते, गुणवंत चव्हाण, माधव मोरे, रामलिंग दराडे हे उपस्थित होते.
 
Top