काटी :- तुळजापूर  तालुक्यातील  तामलवाडी येथील सरस्वती  विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी उस्मानाबाद  येथे दि. 6 ते 8 सप्टेंबंर  या कालावधीत  तुळजाभवानी  स्टेडियम मध्ये  घेण्यात आलेल्या 14  व 19 वर्षे  वयोगटातील जिल्हास्तरीय  कुस्ती  स्पर्धेत  प्रथम  क्रमांक  पटकावला आहे.  

या संघात 14 वर्षीय  वयोगटातून  46 किलो वजन  गटात कु. काशिद स्नेहा सुनिल,  54 किलो वजन गटात   मोरे आकांक्षा अतुल व 19 वर्षीय   कु.चुंगे ज्ञानेश्वरी संतोष  या तीन   खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत  प्रथम क्रमांक पटकावला तर 14 वर्षीय वयोगटातील 33 किलो वजन गटातून कु. लोहार तनुजा बाळासोहब ,कु. पटाडे सानिका संतोष, 39 किलो वजन गटातून  कु रोकडे प्रमिला दत्तात्रय, 42 किलो वजन गटातून कु. घोटकर शिवम इंद्रजीत,  61 किलो वजन गटात पठाण इरफान हमीद या पाच  खेळाडूंनी  द्वितीय क्रमांक पटकावल.

या यशाबद्दल जिल्हा  कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष आ. राणा जगजीतसिंह पाटील,  उपाध्यक्ष शिवाजीराव धुमाळ, सचिव पै. वामन गाते त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बसवणप्पा    मसुते,  उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील,  सचिव  श्री यशवंत लोंढे,नागनाथ मसुते, जितेद्रं माळी, महेश जगाताप, हसन पटेल, सौ. मुक्ताबाई पाटील, सरपंच श्री ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच श्री दत्तात्रय वडणे , श्री मलीकार्जुन  मसुते,  मुख्याध्यापक  श्री जाधव  एस. के., पर्यवेक्षक  श्री  रामपूरे  के. आर. ज्येष्ठ  शिक्षक सर्वर्श्री म्हमाणे एम. एन. श्री  हलकरे  जी. टी., माडजे ए. डी., सावळे सी .के.,श्री मसुते एम एम श्री सिताफळे  एस. डी.,  श्री पाटील  एल . एस़., यांच्यासह सर्व  संचालक  मंडळ   व सर्व शिक्षक शिक्षकेतर  वृंद व राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष  श्री. वडणे एस डी यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले. या यशस्वी  खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री. जाधव पी. पी. व श्री माळी एम. जी. यांचे  मार्गदर्शन लाभले.
 
Top