तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-

श्रध्देला सामाजिक कार्याची जोड देऊन डॉल्बीमुक्त वातावरणात व शांततेत गणेश उत्सव साजरा करून तुळजापूर तालुक्यासह शहरातील  गणेश मंडळा ने सुरूवात करावी . आगामी गणेश उत्सवाच्या मंडळाच्या पार्श्वभुमीवर शहरातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यानी गणेश उत्सव मंडळानी पैशाची उधळपट्टी न करता हा पैसा शहरातील सामाजिक उपक्रमासाठी खर्च करून सामाजीक बांधिलकी जपावी आणि कायद्याचे काटेकोर पालन करून गणेश उत्सव साजरा करावा अथवा कायद्याचे उल्लंघन करून डी .जे .लावला तर पुढील प्रमाणे कारवाई होणार आहे. 

भा.द.वि.स. १८८, २९०, २९१, ३४, सह महाराष्ट्र पो.का.क. १३१, १३४, १३५, १४० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६चे कलम १५ सह ध्वनिप्रदूषण नियम  २००० चे नियम क्र. ३ (१), ४(१), ५ (४) प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार आहे. यामुळे चारित्र्य दाखला देताना याचा उल्लेख दाखल्यात केला जातो. त्यामुळे नोकरी, पासपोर्टसह इतर ठिकाणी त्याचा फटका बसतो. व सर्व मंडळाच्या पदाधिकारी ह्यांच्यावर गुन्हा दाखल होतात.  आर राजा पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांच्या नेतृवाखाली पोलीस उपअधिक्षक संदिप घुगे , पोलीस निरिक्षक राजेंद्र बोकडे व त्यांची पोलिस पतकाने सतरकेचा इशारा दिला आहे.
 
Top