कळंब : भिकाजी जाधव
गत काही दिवसांपूर्वी नगरसेवक शिवाजी राजे कराळे यांनी कळंब तहसील कार्यालय येथे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. तसेच या मागण्या पूर्ण करण्यासाठी १७ सप्टेंबर पर्यंत चा कालावधी दिला होता. परंतु मुदत संपून देखील तहसिलदार यांनी काहीच कार्यवाही न केल्याने आज सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजीपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कळंब येथील तहसिल कार्यालयात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, नागरिकांना बसण्यास खुर्च्या नसुन नागरिकांना ते आरोपी सारखे उभे करतात, तहसिल कार्यालय व मध्यवर्ती इमारतीत ठिक ठिकाणी गुटखा व सुपारी सर्वञ भिंती लाल रंगाने रंगलेल्या दिसत आहेत. नागरिकांना अधिकारी व कर्मचार्यांकडुन सौजन्य पुर्वक वागणुक मिळत नाही. अपंग, जेष्ठ व महिलांसाठी विशेष सवलती मिळत नाहीत. स्वच्छता गृह नाहीत, अभिलेख विभागतील नकला अर्जदारास विहित मुदतीत मिळत नाहीत, कार्यालयीन कामकाजाच्या वेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. नागरिकांच्या कामकाजा बाबत दिरंगाई केली जाते, यासह इतर मागण्याचे मागण्याचे निवेदन देऊन तक्रारीचा पाउसच मांडला होता .या निवेदनाची १६ दिवसांची मुदत संपून देखील तहसिलदार यांनी काहिच कार्यवाही न केल्याने आज राणा दादा युवा प्रतिष्ठान तर्फे बेमुदत धरणे जनआंदोलन व भारतीय प्रतिज्ञेचे पठण या आंदोलनाला आज १७सप्टेंबर रोजी नगरसेवक शिवाजी कराळे यांच्या नेतृत्वाखाली चालू करण्यात आले.
या वेळी भारतीय प्रतिज्ञेचे पठण करण्यात आले. या वेळी राणादादा युवा प्रतिष्ठान चे प्रितम पंडित, अमोल बारटक्के, नारायण(आण्णा) चोंदे, लक्षमण (बंटी) करंजकर, महंमद(भाई) चाउस, राहुल हौसलमल, सचिन क्षीरसागर, संतोष भांडे, गणेश भांगे, राहुल मुळे, सद्दाम तांबोळी, दादाराव खंडागळे, संतोष भंडारे, दिगांबर इंगळे, राहुल चोंदे यावेळी महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.