काटी : उमाजी गायकवाड

भारताच्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेला इतिहासात विशेष महत्त्व आहे.जगात कोणत्याही देशात सापडणार नाहीत असे घटना,प्रसंग,व्यवस्था आपल्या  देशात पहायला मिळतात. भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत व दक्षिण भारताच्या अगदी सीमारेषेवर मराठवाडा स्थित आहे.प्राचीन काळापासून भाषा, संस्कार, संस्कृती, लोककला यांचं वेगळं भावविश्व जपणार्या या मराठवाड्यातील उस्मानबादसह आठ जिल्ह्यांत 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्तीदिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला  जातो.

तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पांगरदरवाडी येथे आज 'मराठवाडा मुक्तीदिन' मोठ्या  उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी प्रभातसमयी विविध घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.त्यानंतर शाळेमध्ये प्रतिमापुजन व ध्वजारोहण  मु.अ. उत्रेश्वर पैकेकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सहशिक्षक श्री.अनिल हंगरकर यांनी 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाविषयी' सविस्तर माहिती सांगितली.तसेच शांताराम कुंभार यांनी सद्यस्थितीतील मराठवाड्याचा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक विकास यांवर भाष्य केले.

या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री.विजय निंबाळकर,शा.व्य.समितीचे सैपन शेख व इतर महिला सदस्य तसेच मु.अ.उत्रेश्वर पैकेकरी,प्रसाद डांगे,हर्षवर्धन माळी,राजेश धोंगडे,श्रीमती.मिनाक्षी मगर व कोरबू  मॅडमसह विद्यार्थी  उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

 
Top