तुळजापूर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने प्रतिवर्षी दिपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक काम करणा-या सहकारी पतसंस्थेस दिला जाणारा राज्य स्तरीय दिपस्तंभ पुरस्कार तुळजापूरच्या तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेस नुकताच लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
ज्या संस्था स्वबळावर आपले कामकाज चालवितात याचबरोबर बदलते आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक, आणि सहकार श्रेत्रातील घडामोडींचा अंदाज घेऊन योग्य समतोल साधून आपले कामकाज करतात सभासदांची विश्वासहर्ता वाढवितात, नफा मिळवितात, आपल्या ग्राहकांचा विकास साधतात आणि प्रगतिचे शिखर गाठतात आशा पतसंस्था राज्यातील इतर पतसंस्था करीता राज्य फेडरेशनच्या वतीने प्रतिवर्षी आशा पतसंस्थाचा दिपस्तंभ पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
यावर्षी लोणावळा येथे आयोजित कार्यक्रमात रामराजे निंबाळकर (सभापती,विधानपरिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते व ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राज्यभरातील पतसंस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी पतसंस्थेस सन२०१६ व सन २०१७ साली हा पुरस्कार मिळाला असून यावर्षी तिसर्या वेळी हा बहुमान संस्थेस मिळाला आहे.
२१वर्षापूर्वी अवघ्या रु.२५०००/- भागभांडवलावर प्रत्यक्ष व्यवहार सुरु केलेल्या संस्थेची वार्षिक उलाढाल रु ४० कोटी रुपयावरती पोहचली आहे. संस्थेकडे विविध प्रकारच्या एकूण १७ कोटी रु.ठेवी जमा असून संस्थेकडून विविध व्यावसायिकांना रु. ०८ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेची कर्ज वसूली ९८% एवढी आहे. संस्थेचे भागभांडवल रु. ९१लाखावर पोहचले आहे. संस्थेस लेखापरीक्षणात सातत्याने अ वर्ग मिळाला आहे. संस्था नुकतेच स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित झाली असून या इमारतीत ग्राहकांना परीपूर्ण बँकींग सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.व तसेच संस्था लवकरच मिनी एटीएमची सुविधा सूरु करीत असून या माध्यमातून सर्व बँकांचे एटीएम कार्डचा वापर करु शकतील हा पुरस्कार संस्थेच्या सर्व ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांना समर्पित करण्यात येतो हा पुरस्कार स्विकारते वेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव जगदाळे, उपाध्यक्ष राजभाऊ देशमाने, संचालक आदिनाथ ठेले, अमीर शेख, महेश साबळे प्रा.निलेश एकदंते संस्थेचे सचिव संजय ढवळे व प्रमोद क्षीरसागर आदी उपस्थित होते.
