तुळजापूर :

वेताळ नगर येथील एका महिलेच्या पतीस पाच जणांनी पैसे देणे घेण्याच्या तक्रारीवरून पतीस फुस लावून पळवुन नेल्याची घटना दि.६ सप्टेंबर रोजी घडली असून पोलीस ठाण्यात पाच जणांना विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तुळजापूर येथील वेताळ नगर भागात राहणाऱ्या मनीषा अनिल धुमाळ यांचे पतीस पैसे देणे घेण्याच्या तक्रारारी हुन धनश्री हॉटेल येथून कुठेतरी फुस लावून पळवुन नेल्या प्रकरणी मनिषा धुमाळ यांच्या फिर्यादीवरून राधे बापू पवार,सचिन लांडगे,अमोल शेंडगे,संतोष चौधरी,अमीर शेख सर्व रा.तुळजापूर यांच्या वर कलम ३६५,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाने हे करीत आहेत.

 
Top