उदया रविवारी श्रीगणेश विसर्जन आहे. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेला थोडंस वेगळ वळण देऊ, पूर्वी पाऊस जास्त पडत होता नदी बारा महिने वाहत असे, आता पाऊस काळ कमी  झाला आहे. तसेच नदीमध्ये श्री गणेशाचे विसर्जन करून व देवाला वाहिलेले निर्माल्य नदी, तलावात टाकून एक प्रकारचे प्रदूषण करत आहोत श्रीगणेश मूर्तीला लावलेले रंग त्यामध्ये असलेले हानिकारक केमिकल पाण्यात मिसळतात व पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे जलचर प्राणी व मानवाला सुद्धा हानी पोहचते. आपण सर्वानी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेऊया. घरच्या घरी श्रीगणेश विसर्जन करुन निर्माल्य झाडाखाली टाकूया...

विसर्जन
एका मोठया टफला किंवा बादलीला फुलाने सजवा त्यामध्ये श्रीगणेशाला विसर्जन करा. ते पाणी झाडांना घाला. किंवा त्यामध्ये नवीन झाड लावा. श्रीगणेशाच्या नावे एक झाड लागेल. ज्यांना जागा नसेल त्यांनी मोकळ्या जागेत किंवा शेतात झाड लावा. झाडांच्या रूपाने बाप्पा आपल्याला सावली रूपी प्रेम देत राहिल आणि फळ रूपी आशीर्वाद देत राहिल.

निर्माल्य
निर्माल्य पायदळी न जाता झाडाच्या आळयामध्ये टाका, चांगले खत होईल .

नाविण्य पूर्ण उपक्रमाचे फायदे :
* प्रदूषण होणार नाही .
* प्रत्येक घरामध्ये एक झाड 
चला तर मग श्रीगणेशाच्या विसर्जनाला एक वेगळे वळण देऊया, आपल्या घरीच श्रीगणेशाचे विसर्जन करूया...

- कविता रमेशराव पुदाले, 
नळदुर्ग
 
Top