काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांची युवक कॉंगेसच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावरगाव कॉंग्रेस कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने येथील काँग्रेसचे नेते माजी जि.प.सदस्य संतोष बोबडे, विद्यमान सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी तुळजापूर विधानसभा नुतन तालुकाध्यक्ष मकरंद डोंगरे, उपाध्यक्ष सलमान शेख, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जि.प.अध्यक्ष धीरज पाटील, उपसरपंच आनंद बोबडे काँग्रेसचे मिडिया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बिदे,काटगावचे ग्रा.प.सदस्य भागवत जोकार, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी येथील जाणता राजा गणेश मित्र मंडळाच्या गगणरायाचे पुजन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या सत्कारास उत्तर देताना शरण पाटील म्हणाले, 2019 ला होवू घालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आगामी काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन जिल्हाभर युवा कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार असल्याचे सांगून स्वर्गीय इंदिरा गांधी, कॉंगेस अध्यक्षा सोनिया गांधी,राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, स्वर्गीय विलासराव देशमुख, महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, आदी काँग्रेस नेतेमंडळीच्या विचारासह काँग्रेस पक्षाची विचारधारा युवकांपर्येंत पोंहचविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 2019 च्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यासाठि युवकांनी कॉंगेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, पांडूरंग राऊत, भागवत डोलारे, अरविंद भडंगे, नेताजी कदम, भागवत जोकार, लक्ष्मण बचाटे, माजी उपसभापती विलास डोलारे, पत्रकार भैय्या कुलकर्णी, दादासाहेब काडगावकर, अखिल शेख, राजू मुल्ला, नागनाथ मसुते, धर्मराज शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
