काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी नऊ वाजता येथील ग्रामपंचायत कार्यालयात या आठवडाभरावर येणारे गणेशोत्सव, बैलपोळा, व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती सदस्यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित सदस्यांना, गणेशोत्सव पदाधिकारी, ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. अशोक चौरे यांनी गावामध्ये होणारे गणेशोत्सव, बैलपोळा, व मोहरम सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच यंदा गणेशभक्तांच्या व गणेश पदाधिकार्यांच्या सोयीसाठी पोलीस आयुक्तालयांनी ऑनलाईनद्वारे अर्जाची व्यवस्था केली असून सर्वानी गणेशोत्सवाचे ऑनलाईन परवाने काढावे व सर्व मंडळींने नियमांचे पालन करावे, व डिजेरहित गणेशोत्सव व मोहरम सण साजरे करुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ऑनलाईन कसे भरायचे यांचेही मार्गदर्शन चौरे यांनी केले. तसेच नियमाचे पालन न करणार्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे चौरे यांनी यावेळी सांगितले. तसेच गावातून कोणाची तक्रार आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सुचना मंडळातील पदाधिकर्या केल्या.
यावेळी सरपंच आदेश कोळी यांनी गावातील सर्व मंडळानी एकाच दिवशी मिरवणूक काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर ग्रामपंचायतने नेमलेल्या कमिटीद्वारे बक्षिस ठेवणार असल्याची संकल्पना मांडली या संकल्पनेला उपस्थितांनी दाद दिली परंतु या संकल्पनेची प्रत्येक्षात अंमलबजावणी होणार का असा प्रश्न उपस्थितामधून चर्चिला जात होता.
यावेळी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रदीप साळुंके, करीम बेग, ग्रा.पं. जितेंद्र गुंड, सुहास साळुंके, भैरी काळे, सतिश देशमुख, चंद्रकांत काटे, जयदीप म्हेत्रे, रमेश जामगावकर, बळीराम ताटे, पोहेकाॅ रामभाऊ टकले, पोहे व्ही. ए.भोसले, पोकाॅ एस.टी. देशमुख यांच्यासह गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.