काटी :- तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील द्राक्ष बागायतदार महादेव विनायक वडणे यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली. शनिवार दि. (8) रोजी सोलापूर येथे झालेल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या विभागीय बैठकीत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष श्री. शिवाजी पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचे उपस्थितीत मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी राज्याचे उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार महेंद्र शाहिर यांच्यासह सोलापूर विभागातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.