काटी : उमाजी गायकवाड
  
तुळजापूर  तालुक्यातील काटी येथे गुरुवार  दि. 17 रोजी    तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने दि. 21 रोजी पार पडणाऱ्या निवडणुका दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गावातील  प्रमुख  मार्गावरून  सशस्त्र पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. काटी येथील औटपोस्ट  पासून ते धनगर  गल्ली, काझी गल्ली, बसस्टॅन्ड, बाजार  चौक,  माळी गल्ली या मार्गावरुन पथसंचलन पार पडले. 21 तारखेला तारखेला राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत, त्यानंतर लगेचच मतमोजणी आणि दिवाळी सण होणार आहे.

यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काटी येथे पोलिसांनी पथसंचलन केले.  तामलवाडी पोलीस  ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. यामध्ये  सीआयएसएफचे जवान  व  होमगार्ड, अधिकारी   असे 60 जण या संचलनामध्ये सहभागी होते.
   
 यानंतर दिवाळी या सणाची तयारी सुरु असून सर्व सण उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा राखला जावा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी  काटी येथे तामलवाडी  पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. पोलिसांचा एवढा  फौजफाटा  पाहून  ग्रामस्थामधून या बाबत बरेच  तर्कवितर्क  लढविले जात  होते.
 
Top