नळदुर्ग, दि. 17 :
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीमुळे जोमात आहेत तर लोकप्रतिनिधी कोमात असल्यगत असुन परिणामी वागदरी गाव मात्र सध्या पाच ते सहा दिवसा पासून अंधारात आहे.
पाच सहा दिवस झाले वागदरी गावला विद्दुत पुरवठा करणारा मुख्य डीपी जळाल्याने गावात सर्वत्र अंधार पसरलेला असून दैनंदिन जीवनातील व्यवहारात मोठ्या आडचणी निर्मान झाल्या आहेत. विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने पिठ गिरणी ,मिरची कांडप यंत्र,फंखे फ्रिज वगेरे बंद झाले आहेत.शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपर्काचे साधन असलेल्या मोबाइल सेवा बंद पडल्याने अनेक आडचणी येत आहेत.कार्यकर्ते निवडणूक प्रचारामुळे जोमात आहेत तर लोकप्रतिनिधी कोमात असल्यागत आहेत.
संबंधित महावितरणचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देवुन नवीन डीपी देण्यस टाळा टाळ करत आहेत.
लोकप्रतिनिधीना निवडणूकीमुळे इकडे लक्ष देण्यास वेळ नाही. यामुळे येथील जनतेला रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. तर दीवसा अनेक आडचणीस सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थानी दिला आहे.