नळदुर्ग  
राष्ट्रीय महामार्गावरील अलियाबाद ( नळदुर्ग ) येथे गुरूवार ता.१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वीटाची वाहतूक करणारा  एम एच अ २५ पी २५४ हा ट्रक नळदुर्गकडून उमरगाकडे जात होता या ट्रकने अलियाबाद पुलावर दोन म्हशींना जोरदार धडक दिल्यामुळे एक म्हैस ठार एक म्हैस गंभीर जखमी झाली.

 मराठा गल्ली येथील बळी जाधव यांच्या म्हशी रामतीर्थ शिवारातून नळदुर्गकडे जात आसताना अलियाबाद पुलावर हा आपघात झाला. हाषअपघात पुलावर  झाल्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच  महामार्ग पोलीस व नळदुर्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. यावेळी महामार्ग पोलीस कर्मचारी  विश्वनाथ शिंदे, रवीशंकर लगदिवे, राहुल चव्हाण, संजय जाधव यांनी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
 
Top