काटी :( प्रतिनिधी ) तुळजापूर तालुक्यातील काटीचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सयाजीराव विजयसिंह देशमुख यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
येथील मित्रमंडळी, व ग्रामस्थांच्या वतीने सायंकाळी साडे आठ वाजता आयोजित कार्यक्रमात सयाजीराव देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते शाल , श्रीफळ व फेटा घालून सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच बाबुमियाॅ काझी, माजी सरपंच अशोक जाधव, शामराव आगलावे, नाशेर काझी, अनिल गुंड, अमर देशमुख, उमेश मिर्झे, उपसरपंच सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, दादा बेग, अहमद पठाण, चंद्रकांत काटे, ग्रा.पं. सदस्य . भैरी काळे, कालिदास घाणे, नानासाहेब आगलावे, त्रिगुणशिल साळुंके, मोहन शिंदे, बाळासाहेब मासाळ, सचिन साळुंके, हारुण शेख, आशिफ बेग, अमिर पठाण, पोपट थोरबोले, बाळा जाधव, सयाजी गायकवाड, मानाजी गायकवाड , आबा गाढवे, कय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.