अणदूर, दि. 18 :

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे तालुक्यातील जनतेच्या मनातील प्रश्न आपल्या समोर ठेवत तालुक्यात रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण, प्रलंबित शिष्यवृत्ती, शासकीय व समाजकल्याण विभागातील योजना गरजूवंतापर्यंत पोहचवणे, स्वातंत्र्यपासून आजपर्यंत रखडलेले ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, तुंबलेले नाले-ओढे गाळमुक्त करून सिमेंटिकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करणे, तालुक्यातील अणदूर, मैलारपूर, चिवरी, दिंडेगाव, रामतीर्थ (नळदुर्ग) आदी देवस्थानांचा विशेष नियोजनात्मक विकास तसेच वेगाने विकास होण्यासाठी अणदूर ला नगरपालिका व नळदुर्ग तालुका होणे आवश्यक आहे आदी विविध प्रकारचे प्रश्न व मागण्या निवेदनाद्वारे प्रमुख उमेदवारासमोर अभाविपच्यावतीने मांडण्यात आले.
        
अभाविप अणदूर शाखेकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  राणा दादा पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकरराव चव्हाण साहेब व प्रहार संघटनेचे उमेदवार महेंद्र काका धुरगुडे या उमेदवारांना दिलेल्या प्रश्नांचा खुलासा जनतेसमोर करण्यासाठी निवेदनात्मक प्रश्न व त्यावरील निवडणुकीनंतरची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन अभाविप ने केले आहे. 

निवडणुकीनंतरही या प्रश्नावर विशेष लक्ष देण्याची विनंती उमेदवारांना करण्यात आली. यावेळी अभाविप अणदूर शहरमंत्री निखिल पवार, आंदोलन मंत्री आप्पा घुगरे, जिल्हा कार्यालय मंत्री अंकुश चिनकरे, केदारनाथ पाटील, ईश्वर चौगुले आदी अभाविप कार्यकर्त्यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

 
Top