जळकोट,दि१९ ( प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील माजी पोलीस पाटील व जुन्या काळातील नाट्य कलाकार निळकंठराव विठोबा कदम- पाटील यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दि.१९( शनिवार) रोजी अल्पशा आजाराने बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.


 त्यांच्या पश्चात पत्नी,३ भाऊ,२ मुले,१ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दि.२०( रविवार) रोजी सकाळी ८.३० वाजता जळकोट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कै. निळकंठराव कदम- पाटील यांनी जळकोट गावचे पोलिस पाटील म्हणून जवळपास ३२ वर्ष काम पाहिले होते. जळकोट व परिसरात जुन्या काळातील नाट्य कलाकार म्हणूनही ते परिचित होते. काही मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिकाही केल्या होत्या. 

कुलस्वामिनी सूतगिरणी, तुळजाभवानी कारखान्याचे माजी संचालक जळकोटचे माजी सरपंच बंकटराव कदम यांचे ते बंधू होत.
 
Top