जळकोट,दि.१९(मेघराज किलजे) : 

तुळजापूर तालुक्यातील मानमोडी शाळेत गावातील गरजू पालकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. यासोबत साबण,तेल,आणि उठणे आशा वस्तुपन देण्यात आल्या .मानमोडी शाळा सतत काहींना काही उपक्रम घेत असते .त्याचाच एक भाग म्हणून सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून गरजू कुटुंबाना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले .यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीपन गुंजकर आणि उपाध्यक्ष शुभांगी सुरवसे यांनी शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्द कौतुक केले. शाळा आणि गाव याचा खूप जवळचा संबंध दिसून येतो .असे गौरव उदगार शिवाजी पवार यांनी व्यक्त केले .यावेळी मुख्याध्यापक विक्रम पाचंगे ,रमेश दुधभाते,रामकृष्ण मोहीते,आणि श्रीमती सुचिता चव्हाण आणि विध्यार्थी उपस्थित होते .
 
Top