माजी सैनिकांच्या वतीने
प्रभाकर लष्करे यांचा सत्कार


जळकोट,दि.३१(मेघराज किलजे):- येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी(नळ) येथील प्रभाकर लष्करे हे भारतीय सैन्यदलात३३ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्तीनंतर गावात आल्यानंतर लष्करे यांचा जळकोट येथील माजी सैनिक संघटना, बचतगट व जळकोटवाडी(नळ) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जळकोट येथील माजी सैनिक संघटना व बचतगटाचे अध्यक्ष यशवंत कदम, जळकोट येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती उपाध्यक्ष बबन मोरे, प्राचार्य गहिनीनाथ काळे, प्रभाकर कदम, पिंटू चुंगे, लहू कदम, राजकुमार कागे, राजेंद्र सगर, माणिक सुरवसे, सुरेश वागदरे, सुधाकर पट्टेवाले, हनुमंत कदम, वसंत करदुरे, जळकोट व जळकोटवाडी(नळ) येथील माजी सैनिक, युवक, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

 
Top