परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान 

जळकोट: दि.३१,मेघराज किलजे

 सध्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांची पिके पूर्णतः पाण्यात आहेत. या अतिवृष्टीचा फटका द्राक्ष बागानाही बसला असून, द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सध्या द्राक्षबागा बहरात असताना, परतीच्या पावसामुळे अतिरिक्त पाणी होऊन, द्राक्ष बागांवर डाऊणी व घडकुजमुळे द्राक्षांचे घड  उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत. द्राक्ष बाग जगविण्यासाठी प्रचंड मेहनत शेतकऱ्यांना करावी लागत असते. परंतु ही मेहनत या रोगामुळे पाण्यात गेली आहे. 
जळकोट, नळदुर्ग महसूल मंडळातील अनेक गावातील शिवारातील द्राक्ष बागा रोगग्रस्त अवस्थेत आहेत.

यंदा द्राक्ष उत्पादनावर प्रचंड परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. तरी डाऊणी व घडकुजमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेच्या नुकसानीचे शासनाने पंचनामा करण्याचे आदेश देऊन, नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
 
Top