रायगडावरील कुटुंबियांना साड्या व फराळाचे वाटप 
स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक 

काटी: दि.२५,उमाजी गायकवाड 
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडीच्या शिवभक्तांनी सामाजिक बांधिलकी जपत किल्ले रायगडावर वास्तव्यास आसलेल्या पंचवीस गरीब कुटुंबियांना दि.23 रोजी साड्या व फराळाचे वाटप केले.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

किल्ले रायगडावर पर्यटकाना विविध वस्तु विकुन आपला उदरनिर्वाह करणार्या कुटुंबियांचीही दिवाळी गोड व्हावी  या उदात्त हेतुने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने तामलवाडी येथील शिवभक्त तथा शिवरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अप्पुराजे भोसले यानी व गावातील तरूण शिवभक्तांनी रायगडावर वास्तव्य करत असलेल्या पंचवीस गरीब कुटुंबियांना दि २३ रोजी प्रत्येकी एक साडी व फराळाचे वाटप केले.नविन साड्या व फराळ मिळाल्याने त्या कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाल्याचा चेहर्यावर दिसुन येत होते.खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजानीच ही भेटवस्तू देऊन आपल्यासारख्या मावळ्यांना आमच्याकडे पाठवल्याची भावना तेथील कुटुंबियांनी व्यक्त केली.


किल्ले रायगड ते तामलवाडी शिवज्योत आणणेसाठी तसे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गेलो असता तेथील गरीब कुटुंबियांची व्यथा ऐकुनच आम्ही हा उपक्रम चालु केला असुन हे दुसरे वर्ष असल्याचे शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिव अप्पुराजे भोसले यांनी बोलताना सांगितले.या स्तुत्य उपक्रमाचे तामलवाडीसह परीसरात कौतुक होताना दिसत आहे.

    यावेळी शिवरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अप्पुराजे भोसले,उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड,योगेश निकम,ज्ञानेश्वर जगताप,विकास घोटकर,राम कांबळे,प्रशांत गायकवाड,तसेच छोटे मावळे किरण भोसले,युवराज भोसले,आर्यन शिंदे,हर्षवर्धन जगताप आदी उपस्थित होते.
 
Top