इटकळ: दि.२५,
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर इटकळ ता. तुळजापूर येथे दि.२४ रोजी सायंकाळी ४च्या सुमारास
भरधाव कारच्या धडकेत एक बालक गंभीर जखमी होवुन उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
रिवाज अहमदहुसेन मकानदार वय ४ असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे.
उमरग्या कडून सोलापूर कडे जाणार्या केए ४१एन४१३७ या कारने रियाज याला जोराची धडक दिली यामुळे गंभीर जखमी झाला. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आसता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिस कर्मचारी यानी २०किमी पाठलाग करून कारला पकडले.
अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाला कारसह ताब्यात घेण्यात आला.