जळकोट मंडळात८८मि.मि. मुसळधार पाऊस

जळकोट,दि.२२, मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट महसूल मंडळात रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत८८ मिलिमीटर पाऊस झाला.

 मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवारा शिवारात पाणी साचले आहे.
जळकोट व परिसराला रात्री ११ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुर, बाजरी, खरीप ज्वारी, मका, भाजीपाला आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 सध्या शेतकरी सोयाबीन काढण्यासाठी लगबग करत आहे. राणा वर काढून टाकलेले सोयाबीन अक्षरशः वाहून गेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन मळणी करण्यासाठी रानावर ढीग मारले आहेत. हे सोयाबीनचे ढिगारे ही या पावसात मोठ्या प्रमाणावर वाहून गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाची नुस्कान झाले आहे.

 शेतकऱ्याचा दिवाळी तोंडावर सोयाबीन पिकाची नासाडी झाल्याने दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही गावांच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जाण्यासाठी येण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

रानावरील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. या अतिवृष्टीमुळे जळकोट गावात दोन घरांच्या भिंती पडले आहेत. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. गावच्या ओढ्याचे पाणी हनुमान मंदिर ला लागले आहे. यामुळे या भागातील काही घरे पाण्याखाली आले आहेत. जळकोट व परिसरात आतापर्यंतचा ८८ मिलिमीटर पाऊस हा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीचा जबर फटका शेतकऱ्याला बसला असून पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी व पंतप्रधान खरीप पिक विमा मंजूर करण्याची मागणी होत आहे.

 
Top