अणदूर : दि.२२
तुळजापूर तालुक्यातील  अणदुर येथिल श्री. श्री. गुरुकुल मधील तेंग सू डो ,बॅडमिंटन, कुस्ती या खेळामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे होते तर सचिव डॉ नागनाथ कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुस्तीमध्ये रोहन लोहार,सिकाई मार्शल आर्टमध्ये पूजा कानडे,श्रेया सूत्रावे,पृथ्वीराज पाटील,घनश्याम मोरखंडीकर, तेंग सू डोमध्ये चेतन कुंभार,उर्मिला चव्हाण , तर बॅडमिंटनमध्ये समर्थ कोकणे यांनी यश मिळवले असून यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,सचिव डॉ नागनाथ कुंभार, संचालिका डॉ रुपाली कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

मुख्याध्यापिका पुष्पा लामतुरे आदींची उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मार्तंड मोकाशे,दादाराव घोडके व रामेश्वर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.रामेश्वर सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
 
Top