तुळजापूर : उमाजी गायकवाड
तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील 24 वा विनाशुल्क राज्यस्तरीय विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह लोकसहभागातून वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी येथील दुर्गा लाॅज माऊली नगरमध्ये उस्मानाबाद जिल्हय़ातील समाज बांधवांची रविवार दि. (10 ) रोजी सकाळी अकरा वाजता मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रस्ताविकात प्रा.अभिमान हंगरकर यांनी मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील यांच्या संकल्पनेतून मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून चालणाऱ्या कार्याची माहिती दिली.
या बैठकीत मेळाव्याची तारीख, नियोजन, मराठा समाजात लग्न जमविण्यास येणाऱ्या अडचणी, समस्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत 1 डिसेंबर रोजी तुळजापूर येथील एस.टी. जवळील पुजारी मंगल कार्यालयात मोफत अतिभव्य राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेटभेट मेळावा घेण्याचे ठरले असून हा मेळावा घेण्यासाठी पुजारी मंडळाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी मंगल कार्यालय मोफत पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा केली. तसेच रविवारी झालेल्या बैठकीस दुर्गादास अमृतराव यांनी दुर्गा लाॅज माऊली नगरमधील आपला हाॅल मोफत उपलब्ध करून दिला होता. या 1 डिसेंबर रोजी तुळजापूरात होणाऱ्या राज्यस्तरीय मराठा वधू-वर थेटभेट भव्य मेळाव्यास अनेक सामाजिक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. अनेकांनी नियोजित वधु-वर थेटभेट मेळाव्यातील विविध जबाबदाऱ्या स्वेच्छेने घेण्याचे मान्य केले.
या वेळी मार्गदर्शन करताना मराठा सोयरीक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील म्हणाले की, एकीकडे मराठा वधु-वरांना लग्न जमविण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना अनेक व्यवसायिक वधु-वर सुचक मंडळे कार्यरत झाल्याने चिंता व्यक्त करीत अशा व्यवसायिक वधु-वर सुचक मंडळावर चौफेर हल्ला चढविला. मराठा समाजातील वधु-वरांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजाचा अवघड प्रश्न हाती घेऊन महाराष्ट्रातील 36 जिल्हय़ातून 320 'मराठा सोयरीक ' हाॅट्स अप ग्रुपची निर्मिती करुन त्या माध्यमातून बायोडाटा व फोटोची देवाणघेवाण ग्रुपवर करुन त्यांच्या पसंतीनुसार अनेक युवक-युवतीनी लग्नाच्या रेशीमगाठी बांधून आजपर्यंत 8400 जोडपी विवाहबंधनात अडकली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. व तुळजापुरात होणारा हा 24 राज्यस्तरीय वधू- वर मेळावा महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी आयोजकांच्या वतीने मराठा सोयरीक संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील यांचा सत्कार केला. तर उस्मानाबाद जिल्हा महिला सोयरीकच्या नवनिर्वाचित अध्यक्षा जयश्रीताई सुर्यवंशी पाटील व लातूरच्या जिल्हा अध्यक्षपदी रंदावणी सुखदेव यादव यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सौ. मधुमती दुर्गादास अमृतराव यांची शहर महिला प्रतिनिधी तर लक्ष्मी कुमार करडे यांची सहप्रतिनिधी नेमणूक करण्यात आली त्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या बैठकील मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ पाटील माजी नगराध्यक सज्जनराव साळुंके, दुर्गादास अमृतराव, नगरसेवक अमर मगर, राहुल खपले, सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ माने, उत्तमराव अमृतराव, दिलीपराव खपले, विजयराव नवले, प्रा.अभिमान हंगरकर, सुहासराव साळुंके, पत्रकार उमाजी गायकवाड, नागनाथ बागल, मस्के मुरुड, पवार, सुखदेव यादव, जयश्रीताई सुर्यवंशी, रंदावणी यादव, सौ. मधुमती दुर्गादास अमृतराव, लक्ष्मी कुमार करडे, कवि प्रदीप शिंदे, दिगंबर कवडे देशमुख, आशिष फंड, उमेश भिसे, प्रा. सुरेंद्र मोरे, दिलीप मगर, लक्ष्मीकांत मगर, अरविंद साळुंके, शाहुराज चव्हाण आदीसह उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, कळंब, औसा, नळदुर्ग, लोहारा येथील वधू-वर पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

