तुळजापूर दि ८ :
विहंगम योग साधना या आध्यात्मिक मार्ग मधून माणसाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक विकास होण्याला मदत होते म्हणून हे विज्ञान आहे याचा समाजातील सर्व स्तरातील नागरीकांनी उपयोग करावा असे आवाहन महाराष्ट्र संत किसनलाल शर्मा यांनी केले.
तुळजापूर पंचायत समिती सभागृहात आयोजित राष्ट्रसंत किशनलालजी शर्मा यांच्या व्याख्यान व विहंगम योग साधना अशा संयुक्त कार्यक्रमात पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक, डॉक्टर डी डी केंकरे, हभप मुरलीधर जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, लघुपाटबंधारे अभियंता गजानन होळकर, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता सरवदे, शिक्षण विभागाचे वाय के चव्हाण, बांधकाम विभाग अभियंता रवी किरण मोहिते, पत्रकार सतिष महामुनी यांची उपस्थिती होती. प्रारंभी सद्गुरु सदाफल देव जी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रसंत किशनलाल जी शर्मा यांचे पंचावन्न किलोच्या गुलाबाच्या पुष्पहार आणि तुळजापूर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
विहंगम योग साधना ही सामान्य लोकांनी केवळ दहा मिनिटे देऊन केली जाणारी साधना आहे कर्मकांड या मध्ये न अडकता केवळ ध्यान करून ही विज्ञानाची अनुभूती प्रत्येकाला घेता येते त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी विहंगम योग साधनेच्या पुणे येथे होणाऱ्या विश्वशांती वैदिक महायज्ञ 16 व 17 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रसंत शर्मा यांनी योग साधना मुळे मनशांती होऊन सर्वत्र आसाममधून माणूस मुक्त होतो आणि तो जगाकडे मोठ्या विश्वासाने पाहतो तसेच आपल्या आयुष्यामधील प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो हा आपला विश्वास आहे आणि तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीतील या सत्संगामध्ये जमलेल्या नागरिकांनी याची अनुभूती घ्यावी असेही सुचवले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी आपण 2015 पासून योगसाधनेची जोडले गेलो आहोत त्यामुळे चेहऱ्यावरील तेज आणि विचारातील प्रामाणिकपणा तसेच वर्तणुकीतील चांगुलपणा प्रभा होण्यासाठी मला अनुभव मिळाला आणि गुरूंच्या सान्निध्यामुळे ज्ञानामध्ये वाढ झाली याचा अनुभव सर्वांनी घेण्यासाठी साधनेचा उपयोग करावा असे सुचवले.डॉ. के के केंकरे यांनी यावेळी विहंगम योग साधनेचे उपयोग स्पष्ट केले. गटविकास अधिकारी मरोड, ह-भ-प जाधव महाराज आणि प्राधिकरण सदस्य नाईक यांना स्व देव हा ग्रंथ राष्ट्रसंत शर्मा यांच्या हस्ते भेट करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.
