तुळजापूर, दि. 07 :

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील 24 वा विनाशुल्क राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याच्या आयोजनार्थ उस्मानाबाद  जिल्हय़ातील समाज बांधवांची रविवार दि. (10 ) रोजी सकाळी  अकरा वाजता  येथील श्री दुर्गा भक्त निवास, नवीन बस स्टँडच्या मागे, माऊली नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी   
महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक अध्यक्ष सुनिलराव जवंजाळ  पाटील हे असणार  असून या बैठकीला नगराध्यक्ष  बापू  कणे, माजी नगराध्यक्ष  देवानंद  रोचकरी, सज्जनराव  साळुंके, उत्तमराव अमृतराव,  विजयराव नवले, नितीनजी बागल, अॅड.  धिरज पाटील,  अमर मगर,  विनोद गंगणे,  नारायण  नन्नवरे, सुनिल (पिंटू ) रोचकरी, अॅड. अनिल काळे, पंडितराव  जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष दुर्गादास अमृतराव कदम, विशाल  रोचकरी, संदीप  गंगणे,  राहुल  खपले, सुहास  साळुंके,  सचिन  रोचकरी, सुहास  साळुंके,  शिवाजी  बोधले, सचिन  पाटील,  प्रभाकर  मुळे आदी  मान्यवरांची   प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  
          
या बैठकीमध्ये मराठा समाज  वधू-वर परिचय  मेळाव्याचे आयोजन व नियोजन संदर्भात चर्चा करण्यात  येणार  असून मेळावा  यशस्वीपणे  पार पाडण्यासाठी विविध  समित्यांचे  गठण करण्यात  येणार आहे. त्याच प्रमाणे संस्थापक अध्यक्ष  सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
     
 महाराष्ट्र मराठा सोयरीक हा एक सेवा भावी सामाजिक यज्ञ असून यामध्ये राज्यातीलच नव्हे देशातील मराठा समाज बांधव स्वयंफुरतीने ,सेवा भावी वृत्तीने काम करीत असून  आजपर्यंत महाराष्ट्रात 8400 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत.  व महाराष्ट्र मराठा सोयरीकच्या माध्यमातून राज्यात 23 जिल्ह्यात विनाशुल्क भोजन व्यवस्थेसह राज्यस्तरीय मेळावे लोकसहभागातून विनाशुल्क   आयोजित करण्यात आले  व महाराष्ट्रात  322 तालुक्यात मराठा सोयरीक या नावाने व्हाट्स अप ग्रुप बनवून  त्या माध्यमातून विवाह जुळवण्याचे कार्य अविरत  सुरू असल्याची  माहिती संस्थापक अध्यक्ष सुनिलराव  जवंजाळ  पाटील  यांनी दिली. 
    
  तरी तालुक्यातील मराठा समाज  बांधवानी मेळावा नियोजनपूर्व बैठकीस बहुसंख्येने   उपस्थितीत  राहण्याचे आवाहन  उस्मानाबाद  जिल्हा महिला सोयरीक संघाच्या नवनिर्वाचित  अध्यक्षा जयश्रीताई सुर्यवंशी पाटील यांनी केले आहे.
 
Top