तुळजापूर दि 12 प्रतिनिधी
हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद केंद्राच्या वतीने संपन्न झाला. हजारो पणत्यांनी तुळजाभवानी मंदिर उजळून निघाले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तुळजापूर आणि उस्मानाबाद यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिराच्या सर्व परिसरात पणत्यांची आरास आणि रांगोळ्या चे रेखाटन करण्यात आले. आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो च्या जयघोषात भाविक भक्तांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. सोलापूर संस्कार भारतीच्या रांगोळी प्रमुख मनीषा मोरवंचीकर आणि त्यांच्या सहकारी यांच्या वतीने मंदिर परिसरात आकर्षक नेत्रदीपक रांगोळ्या काढण्यात आल्या सायंकाळी पाच वाजेपासून स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या भक्तांच्या वतीने पणत्या होमकुंड आणि मंदिर परिसरात सर्वत्र प्रज्वलित करण्यात आल्या.
त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने सकाळपासून भाविक भक्तांची मोठी गर्दी तुळजाभवानी मंदिरात आहे या हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या या उपक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली
