पुस्तक मानवाची चांगली मित्र असतात ते मानवाचा जीवनात प्रत्येक वाटेवर सोबतीला असतात म्हणजे जे लोकं नेहमी वाचन करतात ते कधीच जीवनात एकटे नसतात. ज्या भागात ग्रंथालय असते तेथील वाचकवर्गाला वाचनाची गोडी लागते. एकेकाळ आपला देश नालंदा तक्षशिला सारख्या शिक्षणकेंद्र व ग्रंथालयाने समुद्ध होता व जगभरातील विद्यार्थी शिक्षणाकरीता इथे यायचे. आजचे ग्रंथालय हे फक्त ग्रंथालय नसून माहिती स्त्रोताचे मुख्य केंद्र बनले आहेत जिथे वाचकाला इंटरनेटच्या एका क्लिकवर जगभरातील भरमसाठ माहितीचा साठा क्षणभरात प्राप्त होतो म्हणजे शिक्षणाला दर्जेदार व वाचकाला योग्य ती माहिती कमी वेळात ग्रंथालय देते. ग्रंथालय समाजाचा सर्वच क्षेत्रात दिसते. मानवाचा लहानपणापासून ते जीवनाचा शेवट पर्यंत सोबतीला असते, मग विचार करा की ऐवढ्या महत्वाचा केंद्राचे व्यवस्थापन किती मोठ्या स्तरावर व्हायला हवे?
ग्रंथालय हे ज्ञानाचे भंडार असतात ज्याद्वारे मानव विकासामधे भर पडते तरी सुद्धा आपल्याकडे पुष्कळसे महाविद्यालयीन ग्रंथालय अनुदानीत असून देखील आधारभूत सेवाही देत नाही. आपल्या देशाचा तुलनेने परदेशात ग्रंथालय व शिक्षण क्षेत्राने फार प्रगती केली आहे. ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ग्रंथालयात ऐतिहासिक, दुर्मळ, महागळे, हस्तलिखीत, अद्यावत सर्वच प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. घरीबसल्या किंवा जगात कोणत्याही जागेवर असले तरी सुद्धा वाचक ग्रंथालयीन मोल्यवान माहितीचा साठा वापरू शकतो, वाचकांना ग्रंथालयीन वेबसाईटचे लाॅगईन आयडी पासवर्ड व स्मार्ट कार्ड दिले जातात व ई-मेल किंवा सोशल मिडीया द्वारे ग्रंथालयीन संबंधी माहिती वाचकांना अद्यावत ठेवण्यास नियमित रूपाने पुरविली जाते. वाचकांसाठी 24 तास ग्रंथालयीन सेवा उपलब्ध असतात, वाचक संशोधन केंद्र व तज्ञांना त्वरीत संपर्क करू शकतात, वाचकांचा अडचणीवर ग्रंथालय विभाग त्वरित प्रतिसाद देतात. नविन वाचकांना ग्रंथालयीन भरमसाठ माहितीचा व तंत्रज्ञानाचा वापर कसा, कधी, कोणत्या प्रकारे करावे ह्या संबंधी माहिती नसते म्हणून वाचकांना सुद्धा ग्रंथालय तर्फे माहिती साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात असते. अशाप्रकारे आताचा ग्रंथालयाने माहिती केंद्राचे स्वरूप घेतले पण त्या मानाने आपण प्रगती केली आहे का? आज आपल्याकडील ग्रंथालयाचे नाव घेता आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उद्भवते ते म्हणजे पारंपारीक सर्वसाधारण ग्रंथालय! पण असे का? कारण आपण कित्येक काळापासून असेच ग्रंथालय बघत चाललोय.
ग्रंथालय हे शिक्षणापासून ते समाज, व्यवसाय, शासकीय व इतर सर्व विभागात क्षेत्रात महत्वाचे स्थान निभावतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी याचे विशेष स्थान आहे. आपण प्रगतीच्या खूप गोष्टि करतो की जगात सर्वात जास्त शिक्षण केंद्र असणारे तिसरे क्रमांकाचे देश भारत आहे पण त्या मानाने आपण गुणवत्तेत कुठे आहोत? आज परदेशात उच्च शिक्षणाकरीता सर्वात जास्त विद्यार्थी आपल्या देशातून जातात त्यामागे मोठी रक्कम सुद्धा जात असते, असं का? शिक्षणाचा मुख्य भाग हा ग्रंथालय असून सुद्धा देशातील 90 टक्के ग्रंथालय आता ही आपल्या आधारभूत सोयीपासून दूर आहेत. मोठ्या शहरात ग्रंथालयांची परीस्थिती थोडी फार तरी बरी आहे पण लहान शहरात व ग्रामीण भागात तर ग्रंथालय व्यवस्था खूप काळजीजनक आहे.
ग्रंथालयीन कर्मचारी भरतीवर भर देणे गरजेचेः- शासनाने ग्रंथालयाचा विकासाकरीता मोहीम राबवायला हवी. वाचनाची आवड मुलांना शाळेपासूनच लागायला हवी म्हणजे ग्रंथालयाची भूमिका तेव्हापासूनच चालू असते पण आपल्या राज्यातील अधिकांश शाळा विना ग्रंथालयीन आहेत. ग्रंथालय विभाग असेल तर त्यात ग्रंथसाहित्य नाही, ग्रंथालय कर्मचारी नाही तर कुशल कर्मचारी किंवा आधुनिक तंत्रज्ञान कुठून असणार. कित्येक काळ लोटला पण अनुदानित खाजगी शाळेंवर ग्रंथालयीन कर्मचारीवर्गाचे पद भरत्या झाल्याच नाही. मोल्यवान ग्रंथालयीन साठा धूळ खात पडले आहे. तिथल्या लहान विद्याथ्र्यांना तर ग्रंथालय म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसते मग अशा वातावरणात आपण सुसंस्कृत शिक्षीत भावी पिढी कशी घडविणार? ग्रंथालयाचे महत्व सगळ्यांना पटायलाच हवे. विषयाचा तज्ञ कर्मचारी हाच आपल्या विभागाशी योग्य न्याय करू शकतो तेव्हा केंद्रशासनाच्या नवोदय, केंद्रिय विद्यालय प्रमाणे दर वर्षी राज्यशासनाद्वारे ही अनुदानित खाजगी संस्थेचा शाळेंवर ग्रंथालय कुशल कर्मचारीवर्गाची पद भरती करायला हवी.
ग्रंथालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलायला हवाः- आज आपण ग्रंथालय म्हंटल तर बहुतेक लोक असे मानतात की ग्रंथालय फक्त ग्रंथ देव-घेव सेवेकरीताच असते आणखी त्यात असतेच काय? पण सत्य ह्यावून वेगळे आहे. आजचे ग्रंथालय हे ई-ग्रंथालयाचा स्वरूपात बदलत आहेत. ग्रंथालयाचा साहित्य सामग्री मधे डिजीटल साहित्य, ई-पुस्तक, ई-पत्रिका, आॅडिओ-विडीओ संग्रह, सिडी-डिवीडी, डाटाबेस, आॅनलाईन ग्रंथालयीन सहभागीता, ई-कैटलाॅग, ई-अनुक्रमणिका व इतर सामग्री सुद्धा आॅनलाईन रूपात उपलब्ध असते. जे-गेट, एन-लिस्ट, डेलनेट सारखे अनेक सबक्रीब्शन शैक्षणिक संस्थेकरीता उपलब्ध आहेत जे विद्याथ्र्यांना जगभरातील वेगवेगळ्या विषयावंर भरमसाठ माहिती पुरवितात. ग्रंथालयीन पुर्ण कार्य हे आता आॅनलाईन झाले आहेत अशा काळात कर्मचारीवर्ग सुद्धा कौशल्यपुर्ण तज्ञ व कुशल ग्रंथालयीन प्रबंधक असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात मोठ्याप्रमाणात माहितीचा साठा तयार होतो तेव्हा तो कमी वेळात योग्य वाचकांपर्यंत योग्यरीतीने पोहोचविणे ही जबाबदारीचे कार्य ग्रंथालय द्वारे होत असते. ग्रंथालयीन कार्य ऐवढे सोपी नाही जेवढे ते दिसते या यशस्वी ग्रंथालयीन कार्यप्रणाली मागे संपुर्ण टीम कार्यरत असते. ग्रंथालय बजट, कमेटी, पुस्तक पत्रिका मैगझीन, संदर्भ ग्रंथ व इतर सामग्री निवड खरेदी प्रक्रिया, नोंदणी, वर्गीकरण, बारकोडींग लेबलींग पासून पुष्कळसा प्रक्रियेतून जावे लागते, अनेक प्रकारचे बिल्स, फाईल्स, रिपोर्ट, पत्र-व्यवहार, रिकाॅर्ड, रजीस्टर मेनटेन करावे लागतात, वेगवेगळ्या क्षेत्रातील वाचकवर्ग ग्रंथालयात आपली समस्या किंवा गरजेपोटी येत असतात त्यात सर्वांना योग्य व निवडक माहिती योग्य वेळेत पुरविणे हेच ग्रंथालयाचे ध्येय असते.
अनेक ग्रंथालय हे संपण्याचा वाटेवरः- आज आपण पुष्कळ ठिकाणी बघतो की निधीच्या कमतरतेमुळे ग्रंथालयाचा कर्मचारीवर्गाचे पगार होत नाहीत, ग्रंथालयात आवश्यक साधन-सामग्री नाही, वर्तमानपत्रे, पत्रिका नाही म्हणजे सर्वसाधारणपणे आधारभूत सोयी सुद्धा नाही आणी जे काही थोडेसे साहित्य आहेत ते सुद्धा धूळ खात पडले आहेत. कुठे ग्रंथालयाची इमारत जर्जर झाले आहे तर कुठे हे ग्रंथालय कचराघर झाले आहे. काही ठिकाणी तर ग्रंथालय चक्क स्टोअर हाउस च्या प्रमाणे वापरण्यात येते तर कुठे मोठ-मोठी ग्रंथालय हे तिथल्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचारीवर्गावर चालत आहे. जर ग्रंथालयाला सुखरूप चालविण्याकरीता निधीच नसणार तर ग्रंथालयीन कार्यप्रणाली कशी चालणार. आजचा आधुनिक काळात अशी ग्रंथालय समाजातील विकासात अळचणीचा रूपात आहेत जेव्हापर्यंत हे ग्रंथालय सुधारीत स्वरूपात नाही येणार तो पर्यंत हे मोल्यवान ज्ञानाचे भंडार नष्ट होतच जाणार.
ग्रंथालय कर्मचारीवर्गांनी सुद्धा आपल्या पदाशी न्याय करायला हवाः- ग्रंथालय विषय खूप व्यापक आहे जगभरात ह्या विषयात निरंतर विकास होतच चाललाय पण डाॅ. एस. आर. रंगनाथन द्वारे दर्शविलेले ग्रंथलयाचे पाच नियमांची अमलबजावणी प्रत्येक ग्रंथालयात पुर्णपणे होते का? खाजगी संस्थेत निधीच्या कमतरतेचा प्रश्न असतोच पण अनुदानित महाविद्यालयीन ग्रंथालय हे आपल्याकडे संशोधन केंद्राचा स्वरूपात का विकसीत होत नाहीत? प्रत्येक महाविद्यालयातील ग्रंथालय हे संशोधन केंद्र व्हायलाच हवे. प्रत्येक ग्रंथालयातील ग्रंथसाहित्याला वाचक मिळालाच पाहीजे व ग्रंथालय नियीमत रूपाने प्रगतीपथावर वाढतच राहीले पाहीजे. ग्रंथालय कर्मचारी नेहमी ग्रंथालयाचा विकास व ग्रंथालयीन नियमांचे पालन करणारा असायला हवा तेव्हाच तो आपल्या पदाशी न्याय करू शकतो.
डाॅ. प्रितम भि. गेडाम
मोबाईल क्रं. 082374 17041
prit00786@gmail.com
