उमरगा : लक्ष्मण पवार
भारतीय बालरोग संघटना शाखा उस्मानाबाद ला राज्य परिषद संघटनेचे प्रथम पारितोषिक अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य पातळीवरील परिषदेत सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सर्व बालरोग तज्ञाची राज्य स्तरावरील परिषद अमरावती येथे १५ ते १७ नोव्हेंबर रोजी पार पडली. या परिषदेत उस्मानाबाद शाखेचे वार्षिक काम मोलाचे असल्यामुळे वेगवेगळ्या तीन विभागात प्रथम क्रमांक पटकावला. यात सर्वोत्कृष्ट शाखा,ओआरएस आठवडा अवरनेस प्रोग्राम,बेस्ट फिडींग ( स्तनपान ) अवरनेस प्रोग्राम या विविध स्तरातील ३ उत्कृष्ट पुरस्कार देवून गौरविले आहे.
यावेळी जिल्हा बाल रोज तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एस. थिटे, विद्यमान सचिव डॉ. प्रशांत मोरे, कोषाध्यक्ष डॉ. एन. डी. बिराजदार यांनी अथक परिश्रम घेवून शाखेला प्रथम क्रमांक मिळवून दिला.
जेव्हापासुन उस्मानाबाद शाखेची सूत्रे उमरगा येथील डाँक्टरांनी घेतली आहेत तेव्हांपासुन अनेक उपक्रम घेत सम्पूर्ण महाराष्ट्र भर नाव लोकिक केलेला आहे.
या पारितोषिक चे श्रेय जिल्ह्यातील पूर्ण बालरोगतज्ञांचा हातभार आहे. यात
प्रामुख्याने उस्मानाबाद शाखेचे उपाध्यक्ष - डॉ. श्रीनिवास हम्बिरे,
डॉ. मुळे, डॉ. समीर, डॉ. सोनटक्के, डॉ.अभय पाटिल, डॉ. अभय शापूरकर यांच्यासह डॉ. सुचेता पोफळे,डॉ.रामकृष्ण लोंढे यांचे सहकार्य मोलाचे आहे.
यापुढील काळात चौरस राहून सर्वोत्तम काम करण्यात येईल असा विश्वास डॉ. प्रशांत मोरे यांनी दर्शविला आहे.
