तुळजापूर : उमाजी गायकवाड

संपूर्ण  भारताच्या विविध प्रांतामध्ये पसरलेल्या मराठा समाजाला आपल्या उपवर वधू वराच्या सोईरीकीच्या   निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून  मराठा समाजाचे संघटन  एकत्रित करण्याचे कार्य मराठा सोयरीक वधू-वर परिचय मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील जंवजाळ पाटील यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. त्यांच्याच प्रेरणेतून तुळजापूरातील मराठा सोयरीक वधू-वर परिचय मेळावा समितीच्या वतीने आयोजित मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दि. 1 डिसेंबर 2019 रोजी तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालय, जुन्या बस स्टँडसमोर तुळजापूर येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे सकाळी 8 ते 5 या कालावधीत  आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

समाजातील अनिष्ट चालीरीती, बोकाळलेल्या विवाह संस्था, विवाह जोडणीत निर्माण झालेले दलाल या सर्वांना आळा बसवण्याचा हा अल्पसा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर सुरू आहे. या प्रयत्नातून दलालांना व फसवणूक करणाऱ्या विवाह संस्थांना जरब बसवण्यात महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाला  बरेचसे यशही मिळालेले आहे. पालकांच्या अवाजवी उंच अपेक्षेमुळे फार मोठी विषमता आज समाजात निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाच्या मुली मिळेनाश्या झाल्या आहेत.  शिवाय मधल्या काळात मुलींचा जन्म दर कमी झाल्याने  राज्यात प्रत्येक खेड्यात 100 च्या वर मुले आहेत की ज्यांच लग्नच जुळेल की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही भयानक विषमता दूर करणेसाठी महाराष्ट्र मराठा सोयरिकचे मेळाव्याच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.        
  
कर्मन्य वाधिकारस्ते माफ्लेशु कदाचन  गृहस्थाश्रम हा एक पवित्र आश्रम त्यासाठी विवाह विधी महत्वाचा आहे. विवाह जमविणे जेवढे  जिकरीचे तेवढेच  महत्वाचे कार्य आहे, हे एक सामाजिक व सेवाभावी काम असून त्याच वृत्तीने ते केले तरच खरा आनंद व समाधान मिळते. याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून 29 जानेवारी 2016 रोजी  सोशल मीडियाचा आधार घेऊन विदर्भातील बुलडाणा शहरातून सुरू झालेली महाराष्ट्र मराठा सोयरीक ही संकल्पना आज देशव्यापी बनत चाललेली आहे.  1जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र मराठा सोयरीकचा पहिला राज्यस्तरीय मेळावा घेण्याचा बहुमान  अहमदनगर जिल्ह्याने मिळवला होता. त्याच धर्तीवर रविवार दि.  1 डिसेंबर  2019 रोजी तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयात महाराष्ट्रातील संपन्न होणारा भोजन व्यवस्थेसह विनाशुल्क  मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा हा  राज्यातील 24 वा मेळावा असणार आहे. 

तर  सिल्व्हर जुबली  म्हणजे 25 वा मेळावा हा जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात लातूरमध्ये घेण्याचा मानस आहे जंवजाळ पाटील यांनी व्यक्त केला आहे. व याच मेळाव्यात महाराष्ट्र मराठा सोयरिकचे संस्थापक सन्मानीय श्री जवंजाळ पाटील यांचा गुण गौरव सोहळा पार पडणार आहे. तुळजापूर येथे रविवार दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या विनाशुल्क थेठभेट  वधू-वर परिचय मेळाव्यास मराठवाड्यातील वधू-वरांनी, पालकांनी बहुसंख्येने सहभागी  व्हावे असे आवाहन मराठा समाज सोयरीक वधू-वर परिचय मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील बुलढाणा यांनी केले आहे. तसेच  तुळजापूरात   होणाऱ्या मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्या संदर्भात मराठा सोयरीक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील व तुळजापूर  मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा समितीची  यांची संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी अकरा वाजता येथील पुजारी मंगल कार्यालयात  घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बा॑धवानी उपस्थित राहण्याचे आवाहन  संस्थापक अध्यक्ष सुनीलराव जंवजाळ पाटील व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पत्रकार उमाजी गायकवाड यांनी केले आहे.
 
Top