• अक्कलकोट महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई , बोट जाळण्यात आली


अक्कलकोट दि.१०
अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ येथे काल नदीपात्रातील वाळू उपसा होत असल्याची बातमी लागताच तहसीलदार अंजली मरोड यांनी तत्काळ आपल्या पथकासह टाकलेल्या धाडीत एक बोट मिळून आली, ती बोट महसूल विभागाच्या पथकाने जाळली.
           आणि दुसरी विशेष कामगिरी म्हणजे कोर्सेगाव येथील वाळूमाफियाचे धाबे चांगलेच दणाणून सोडले असून, कोर्सेगाव येथील नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची बातमी लागताच दोन दिवसांपूर्वी तहसीलदार अंजली मरोड यांच्याच पथकाने दुसरी धाडसी कारवाई केली असून, कोर्सेगाव येथील नदीपात्रात धाड टाकून तिथे ही एक सापडून अली  बोट जप्त करून, ती बोट ही जाळून टाकण्यात आली.
         पण, त्या झालेल्या कारवाई दरम्यान वाळूमाफियानी बोट टाकून पळ काढला अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील कारवाई व कलकर्जाल याठिकाची कारवाई चा धसका  वाळूमाफियानी घेतला आहे. महसूल विभागाच्या अचानक केलेल्या कारवाईने संपूर्ण तालुक्यातील वाळूमाफियाचे धाबे दणाणले आहेत.
               ही कारवाई महसूल सर्कल एस जी निंबाळकर, व सर्कल राणा वाघमारे, तलाठी समाधान काळे, एस चोरमुळे, घाटे,  यांच्या उपस्थित, तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

अक्कलकोट तालुक्यातील अवैध वाळू उपसा करण्याऱ्यावर मी व आमचे पथक करडी नजर ठेवून असून, वाळूमाफियावर  वेळोवेळी आम्ही कारवाई करून जप्तीची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुणाला तालुक्यात वाळू उपसा सुरू असल्याची बातमी लागली तर तत्काळ तहसिल कार्यालयाशी संपर्क साधा व त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
तहसीलदार- अंजली मरोड, अक्कलकोट*
 
Top