अणदूर, दि. 3 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अणदूर शाखेच्या वतीने मंगळवार (दि. 3) रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अणदुर येथील जवाहर विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी जिल्हा समिती सदस्य केदारनाथ पाटील,शहरमंत्री प्रशात सुरवसे, खंडु टिकंबरे, तुळशीराम घोडके, अनिकेत घोडके, प्रविण सुरवसे, अक्षय पैलवान आदी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
