सध्या कोरोना व ची भीती सर्वत्र आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.राज्यात कलम 144 लागू झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल माध्यमातून कळवले आहे.कि जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी आस्थापने चालू राहतील.
याकरता नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी कठोर पावले उचलली असून रोज भरणारा भाजीपाला भवानी रोड वर विक्री होत असतो यामुळे वाढती गर्दी लक्षात घेता दिनांक 26 गुरुवार पासून रोज भाजीपालाची विक्री आठवडा बाजार येथील "मच्छी मार्केट" येथे भरविण्यात येईल तरी शहरातील सर्व नागरिकांनी आठवडा बाजार येथील "मच्छी मार्केट" मध्ये भाजीपाला खरेदी करण्यास जावे दक्षता म्हणून तेथे नगरपरिषदेने सर्व उपाययोजना केल्या आहेत. हात वाशिंग स्वच्छता, तोंडावर मास लावून मध्ये प्रवेश करावा तसेच पुढील आदेश येईपर्यंत येते रोजचा भाजीपाला विक्री चालू राहील असे मुख्याधिकारी अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
