नळदुर्ग, दि. २५ :

संचारबदीच्या काळात नागरिकाना जिवनावशयक वस्तु उपलब्ध राहणार आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भाजीपाला व फळ  विक्रेत्यांना बसविले जाणार  असल्याचे आरोग्य सभापती सौ. भारती सुनिल बनसोडे यानी सांगितले .

कोरोना हे छातीत धडकी भरविणारे नाव. त्यामुळे सर्वानीच घरी बसून त्यावर मात करावी या हेतूने देशभरात  लॉक डाउन करण्यात आले आहे.  या काळात नागरिकांना जिवनावश्यक वस्तू नियमित मिळाव्यात या साठी स्थानिक पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक सेवा तर सुरूच आहे तरी पण  उद्यापासून शहरातील काही ठराविक किराणा दुकानं परवाना देऊन ती नियमितपणे  उघडी ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही.  तसेच भाजीपालाही नियमितपणे मिळावा यासाठी  नळदुर्ग बस स्थानका समोरील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भाजीपाला व फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. त्यामुळे आपणास दररोज ताजा भाजीपाला मिळणार आहे.  भाजीपाला पुन्हा मिळणार नाही म्हणून नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. भाजीपाला किंवा किराणा माल घेतानाही नागरिकांनी 2 ग्राहकांमध्ये किमान 3 फुटाचे अंतर ठेवूनच खरेदी करावी. खरेदीला येताना कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाजारात यावे.  जेणेकरून नाहक गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. *कोरोना* हा व्हायरस तुम्ही गरीब आहात की श्रीमंत किंवा आणखी कोण? आहात हे पाहणारा नाही. गर्दीत याची लागण कोणत्याही व्यक्तीपासून होऊ शकते. त्या मुळे सर्वांनी आपली पर्यायाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आवश्यक असेल तरच घराबाहेर खरेदीसाठी पडा अन्यथा घरामध्येच थांबा त्यातच आपले हित आहे.
 
Top