नळदुर्ग, देि. २५ :
वागदरी ता.तुळजापूर येथे साडेतीन महुर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुडीपाडवा मराठी वर्षाचा शुभारंभ असा सर्वांगाणी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या गुडीपाडवा सणावर या वर्षी कोरोना व्हायरसचे सावट आले असून या सावटाखाली हा सण साजरा करण्यची वेळ वागदरीकरावर आली.
सकाळ पासुनच आपापल्या घरा समोर रांगोळी काढून सणानिमित्त गुडी उभारण्यात आले.असले तरी म्हणावा तसा उत्साह चेहऱ्यावर दिसून आला नाही. जनता कर्फ्युत वाढ झाल्याने सणाला माहेरी येणाऱ्या सासरवासीन मुली,पुणे, मुंबई येथून येणारे मुलं आहे त्याच ठिकाणी स्थानबध्द झाल्याने कुटुंबातील आनंद कोरोनाने हिरावून घेतल्याचे जाणवत होते.
गुडीपाडवा निमित्ताने आयोजित विवाह,साखर पुडा ,दुकान पुजा या सारख्या कौटुंबिक कार्यक्रमवर ही कोरोनाचा परिणाम झाला असल्याचे दिसून आले. चा
चौ पाहूणे एकत्र येवुन केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला कोरोनाच्या खिळ बसली. लहान मुलांच्या गळ्यात साखरेचे , खारीक खोबऱ्याचे हार घालण्यात आले असले तरी एकमेकांना भेटण्याचा आनंद कोरोनाने हिरावलं असेच म्हणावे लागेल.सकाळीच गावचे सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रामसेवक जी. आर.जमादार, ग्रा. प.सदस्य रावसाहेब वाघमारे, पोलीस पाटील बाबूराव बिरादार, रोजगार सेवक ज्ञानेश्वर परिहार, ह.भ.प. राजकुमार पाटील आदीनी कोरोना संचारबंदी व शासनाच्या सुचनाचे पालन करा, घराबाहेर निघु नका स्वतःची काळजी घ्या, पर्यायाने गावच्या आरोग्याची काळजी घ्या असा संदेश दिला. त्यामुळे गुडीपाडच्या शुभेच्छा ऐवजी स्वतः ची काळजी घ्या असा संदेश दिला.
