खानापुर, दि.  27 : 

तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, तहसीलदार सौदागर तांदळे व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे कोरोना सहायता कक्ष स्थापन करण्यात आले.
  
 या सहायता कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून ग्रामसेविका घुले एस.ए  यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तर कोरोना सहायता समितीमध्ये सहाय्यक म्हणून तलाठी प्रशांत देशमुख, कृषिसेवक सुनील जोगदंड, मुख्याध्यापक बशेटी, सहशिक्षक भीमराव घोडके,मा जि.प.सदस्य वसंतराव वडगावे,पो पाटील अमोल हिप्परगे, ग्रामरोजगरसेवक इब्राहिम पटेल, संगणक परिचालक बालाजी गायकवाड, आशा कार्यकर्ती शुभांगी सातपुते, अंगणवाडी कार्यकर्ती,सा व राजकीय कार्यकर्ते, गावातील युवक यांचा  समावेश करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच उत्तम धुते, उपसरपंच रहीम मुजावर,इ मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

     
सहायता समितीने पुणे,मुंबई सह इतर बाहेर गावहून आलेल्या व्यक्तींची भेट घेऊन त्यांची नोंद घेतेली.आतापर्यंत बाहेरगावहून आलेल्या 90 जणांची नोंद झाली आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच विशेष काळजी घेण्याच्या व बाहेर न फिरण्याच्या, 15 दिवसापर्यंत कोणाच्या संपर्कात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गावातील ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये,जमाव करून बसू नये आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी अन्यथा जमावबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.खानापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवशयक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत.धुराची फवारणी केली जात आहे.जनजागृतीसाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी दवंडीद्वारे  दिल्या जात आहेत.जनजागृतीसाठी पोस्टर लावण्यात आले आहेत.प्रशासन आपल्या आरोग्यासाठी कार्यरत आहे.आपण सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच उत्तम धुते यांनी केले आहे.
 
Top