काटी, दि. 26 :
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम व तहसीलदार सौदागर तांदळे तसेच बीडीओ मोरड साहेब यांच्या सूचनेनुसार गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय व कोरोना मदत सहायक कक्षाच्या वतीने सम्पूर्ण गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती उपसभापती चित्तरंजन सरडे , कोरोना सहायता कक्षाचे प्रमुख ग्रामसेवक श्री . सुरवसे एल के सरपंच सत्तार मुलानी , पोलिस पाटील लक्ष्मण माळी , शाम पाटील , ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब डोंगरे , पत्रकार चांदसाहेब शेख .तसेच सर्वच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच या समितीचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
गावांतील काही नागरिक विनाकारण फ़िरत असतील तर त्यांच्यावर संचारबंदी कायद्याच्या चौकटीत कारवाई केली जाईल असेही यावेळी समितीच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे तसेच बाहेर आलेल्या नागरिकांची माहिती देऊन सहकार्य असेही आव्हान यावेळी करण्यात आले

