नळदुर्ग, दि.२८ :
अणदूर नळदुर्ग जळकोट केमिस्ट संघटनेच्यावतीने नळदुर्ग पोलीसाना सानिटायझर व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसआधिकारी , कर्मचारीना शनिवार रोजी सानिटायझर मास्कचे वितरण करण्यात आले.
या वेळी बोलताना साहय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे म्हणाले की, औषधी दुकानदार धोका पत्थकरुन समाजाची सेवा करीत आहेत. या संकटाला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन दुर करु , आपणही नियमाचे पालन करून लोकांना सेवा द्यावी.
यावेळी नळदुर्ग अणदूर जळकोट केमिस्ट संघटनेचे येथील संजय जाधव, विकास करपे ,गणेश मोरडे, दीपक पवार ,संतोष मूळे, आप्पासाहेब गोगाव ,सचिन कासार, काझी ,गायकवाड नरवडे ,शिरगुरे,गोविंद शिंदे ,अजय अंदूरकर ,गुणवंत मूळे ,वैजू कुंभार ,शंकर जवळगे,जीवन मोजगे, महेश कार्ले आदी औषध विक्रेते उपस्थित होते.
