काटी, दि. 28 :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी प्रकाश रंगनाथ आगलावे वय (60) या शेतकऱ्यांने शनिवार दि. 28 रोजी सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काटी येथील शेतकरी प्रकाश रंगनाथ आगलावे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एक लाख पंच्च्याऐंशी हजार कर्ज होते. चालू बाकीत असल्याने त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही व ते कॅन्सर या रोगाने पिढीत होते. या नैराश्यातून त्यांनी शनिवारी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. तामलवाडी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नाईकवाडी आणि तलाठी गुळवे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृताचे शवविच्छेदन सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माजी सरपंच शामराव आगलावे यांचे धाकटे बंधू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
