खानापूर, दि. ३१ :

कोरोनाच्या पाश्वभूमीवर दि.31मंगळवार रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जनता कर्फ्यु घोषित केला होता. यानिमित्त अणदुर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पोलिसांसह गरजुंना अन्नाचे पाॅकिट, पाणी तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. 

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी जनता कर्फ्यू घोषित केल्याने तुळजापूर तालुक्यातील अणदुर परिसरासह ग्रामीण भागात शुकशुकाट होता. दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. त्या अनुषंगाने मंगळवारी अणदूर येथील चन्नबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरजुंना मदत करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील खानापूर नाका येथिल सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अन्नाचे पाकिट, पाण्यासह मास्कचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले नागरिक, मनोरुग्ण यांनाही संस्थेच्या वतीने मदत केली गेली. संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर तिरगुळे, सचिन तोग्गी यांनी मनोरूग्णांचा शोध घेऊन त्यांना जेवण दिले. काही परप्रांतिय मजूंर पायी त्यांच्या गावी जात होते. त्यांची संस्थेच्या वतीने  हात धुण्यापासुन ते पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह जेवणाची सोय करण्यात आली.सर्व हाँटेल बंद असल्याने या वेळी भुकेने व्याकुळ झालेले चेहरे सर्व काही सांगुन गेले. यासह अनेकांची भूक भागविण्याचे कार्य संस्थेने केले. सहायक पोलीस निरीक्षक अमित मस्के यांनी चन्नबसव संस्थेच्या या कार्याचे कौतूक केले.
 
Top