नळदुर्ग, दि. 20 : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बीटच्या वतीने बिट मधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकानी निधी जमा करून जवळपास 105 किटचे वाटप करण्यात आले. या बिट अंतर्गत येणारे शहापूर व नळदुर्ग  केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी  निधी   गोळा केला.

सदरील उपक्रमाबाबत विस्तार अधिकारी सौ राऊत  यांनी आवाहन  केल्याने शहापूर केंद्रप्रमुख  कानडे  व नळदुर्ग केंद्रप्रमुख  अलुरे  यांनी   लगेच होकार दिला .गरजुना मदत करण्याबाबत शिक्षकांना  आवाहन करण्यात आले.

त्यानुसार  ५ दिवसामध्ये जवळपास १०५ किटचे पैसे जमा करुन दि. २० एप्रिल रोजी या सर्व किट तयार करण्यात आले, त्यामध्ये  गहू, तांदूळ, तेल , साखर व इतर गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या.

सदरील किट नळदुर्ग बिट अंतर्गत येणाऱ्या 26 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकानी शाळेतून गरजू विद्यार्थ्याची निवड करून ती यादी केंद्रप्रमुख यांचेकडे दिली .   त्यानुसार मुख्याध्यापक यांचेकडे  गटशिक्षणाधिकारी  जाधव  , विस्तार अधिकारी  राऊत , विस्तार अधिकारी  माळी , विस्तार अधिकारी  सर्जे  , केंद्रीय मुख्याध्यापक  इटलकर व  अलुरे , तसेच बिटमधील शिक्षक संघटना प्रतिनिधी  बिलाल सौदागर,  प्रशांत मिटकर ,  पवन सुर्यवंशी,  निझाम इनामदार यांच्या उपस्थितीत  किटचे वाटप करण्यात आले. 

कोरोणा संदर्भातील सर्व नियम सोशल डिस्टसिंग व प्रत्येकाला अगोदर सॅनिटायझर हाताला लावूनच वाटप  करण्यात आले.
 
Top